“सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” उपक्रम


समाजामध्ये जागृकता निर्माण करणे ही समाजसेवा : पीआय निलेश तांबे

सातारा
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च सातारा आणि क्विक हिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” उपक्रमाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचारी यामध्ये सायबर धोके, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियेतल्या धोके व डेटा गोपनीयतेबाबत जागरूकता निर्माण करणे हे होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक निलेश तांबे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणूक कशी केली जाते, काय काय इशारे असतात, आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले व इन्स्टिट्युशनमधील विद्यार्थी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सायबर वॉरियर म्हणून करत असलेल्या कामाबद्दृल इन्स्टिट्युटचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सायबर पोलीस वर्षा खोचे आणि सीमा भुजबळ यांनी विविध सायबर गुन्हे कसे घडतात, त्यापासून कशी खबरदारी घ्यावी यावर माहिती दिली. यामध्ये डेटा गोपनीयता, पासवर्डचे महत्व, सुरक्षित व्यवहार व सोशल मीडियावरील धोके इत्यादींचा समावेश होता.

Advertisement

या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. बी.एस. सावंत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खोट्या अमिषाला बळी पडू नका व विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जाऊन जनजागृती करावी असे आवाहन केले. संगणक विभाग प्रमुख डॉ. आर.डी. कुंभार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या समन्वयक पी.ए. लोखंडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचा एक आकर्षक भाग म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेवर आधारित पथनाट्य सादर केले, ज्याने सायबर शिक्षा आणि सायबर सुरक्षा संदेश प्रभावीपणे मांडला.

कार्यक्रमात सायबर सुरक्षेबाबत प्रा. प्रियंका लोखंडे यांनी सर्वांना शपथ दिली व आभारप्रदर्शन केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!