साताऱ्यात आज गाण्यांची सुश्राव्य मैफिल


अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

Advertisement

सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व रंगोली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी व मराठी गीतांची सूश्राव्य मैफिल रविवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या 84 व्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्यावर चित्रित झालेली विविध सुपरहिट गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये हृदयनाथ गायकवाड,रवींद्र खांडेकर, सुजित घोगले, वैशाली चंद्रसाली हे कलाकार विविध गाणी सादर करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत कात्रे, मुकुंद फडके, सुरेखा शेजवळ, डॉक्टर कामिनी पाटील ,शिरीष चिटणीस, विनायक भोसले उपस्थित राहणार आहेत.
सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!