कृषी निर्यात दुप्पट करणार


केळी-आंब्यासह या 20 पिकांच्या निर्यातीत होणार वाढ
नवी दिल्ली
सरकार देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे. त्याप्रमाणे त्यांच्या शेतातील पिकाला चांगला बाजार भाव मिळावा. यासाठी विविध योजना आणत असतात आणि अनेक धोरण देखील आखत असतात.अशातच आता सरकारने शेतमालाच्या निर्याती संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकार आता केळी आणि आंब्यासह इतर 20 पिकांची निर्यात वाढवणार आहे. शेतमालाची निर्यात दुप्पट करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. यासाठी त्यांनी एक कृषी आराखडा देखील तयार करायला घेतला आहे. निर्यात धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि शेतमालाला देखील चांगला भाव मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कृषी निर्यात वाढवण्याचा सरकारचा निर्णय आहे. यासाठी सरकारने 20 कृषी पिकाची यादी देखील तयार केलेली आहे. या 20 पिकांची निर्यात आता दुप्पट करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा भाव अधिक मिळणार आहे. यावेळी वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी शेतमालाच्या निर्यातीच्या संदर्भातील माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे येथे तीन ते चार दिवसात या संदर्भात कृषी आराखडा देखील तयार केला जाणार आहे. जगाच्या तुलनेत भारताचा निर्यातीचा वाटा हा 2.5% आहे आणि हाच निर्यातीचा वाटा आता 4 ते 5 टक्के करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.

Advertisement

शेतमालाच्या निर्यातीत वाढ करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. यावेळी द्राक्ष, डाळिंब, टरबूज, पेरू, हिरवी मिरची, शिमला मिरची, भेंडी, लसूण, कांदा, शेंगदाणे, काजू, म्हशीचे मांस, गूळ, नैसर्गिक मध आणि तूप यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश असणार आहे आणि निर्यातीच्या संदर्भात आराखड्यावर देखील सरकारचे काम सुरू आहे.
सध्या जगभरात भारतीय शेतमालाची मागणी वाढत आहे. त्यामुळे इतर उत्पादकांपर्यंत भारतातील शेतीमाल पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सध्या अमेरिका, मलेशिया, कॅनडा, रशिया, जर्मनी, फ्रान्स, कोरिया, चीन, इंडोनेशिया, जपानी, युके यांसारख्या देशात भारतातील शेतमालाची निर्यात केली जाते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!