गायिका पलक मुंच्छलचे दातृत्व


3000 मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया, गिनीज बुककडून दखल

Advertisement

मुंबई
मनोरंजन विश्वातील बरेचसे कलाकार हे सामाजिक कार्यात सक्रीय असतात. असंच एक बॉलिवूडमधील नाव सध्या चर्चेत येत आहे.काही मुलांना जन्मत: हृदयाच्या आजाराचा असतो. अशा मुलांच्या उपचाराचा खर्च त्यांच्या पालकांना परवडत नाही. त्यामुळे या मुलांच्या उपचारासाठी बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका ‘पलक मुंच्छल’ कायम मदतीसाठी पुढे असते. पलकने 3000 मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियांचा खर्च केला आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर नेटकरी आणि दिग्गज कलाकारांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला.पलकने 3000 मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या असून त्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. अजूनही काही मुलांची शस्त्रक्रिया बाकी असून लवकच तेही त्यांच्या कुटुंबासोबत चांगलं आयुष्य जगतील असा मला विश्वास आहे. पलकच्या या पोस्टने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!