साताऱ्यात बुधवारपासून राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले व्याख्यानमाला


शुक्रवारी होणार राजमातांचा जयंती सोहळा साजरा

Advertisement

सातारा
येथील पुण्यशील राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले ग्रंथालयातर्फे राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले व्याख्यानमाला बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर ते शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर 26 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा डॉ यशवंत पाटणे यांनी दिली. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा समारंभ शुभारंभ होणार असून यावेळी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ यांचे वाचन संस्कृती काळाची गरज या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांचे आधुनिक काळातील सामाजिक भान या विषयावर व्याख्यान होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे असणार आहेत. शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी राजेंद्र घाडगे यांचे फर्जंद शहाजीराजे भोसले या विषयावर व्याख्यान होणार असून यावेळी उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्तात्रय बनकर अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.याच दिवशी राजमातांचा जयंती सोहळा साजरा केला जाणार आहे.व्याख्यानांचे हे कार्यक्रम साडेपाच वाजता होणार असून पुण्यशील राजमाता श्रीमंत छत्रपती भोसले सुमित्राराजे भोसले ग्रंथालय सदर बाजार सातारा येथे ही व्याख्याने होणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत नलावडे, कोषाध्यक्ष श्रीमती सुनिता कदम, प्रमुख कार्यवाह नंदाताई जाधव, उपकार्यवाह हनुमंत जाधव व कार्यकारी मंडळ सदस्यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!