विश्व संवाद केंद्रातर्फे माध्यम सहकारी स्नेहमिलन
शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी हॉटेल राधिका पॅलेस येथे आयोजन
सातारा
विश्व संवाद केंद्र पुणे यांच्यातर्फे माध्यम सहकारी दीपोत्सव स्नेहमिलन 2026 या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हॉटेल राधिका पॅलेस येथे करण्यात आले आहे. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे अनुभव, विचार आणि आनंदाची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे याच भावानेतून विश्वसंवाद केंद्रातर्फे या स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले आहे. माध्यम क्षेत्रातील सहकाऱ्यांनी या स्नेहमिलन कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन विश्व संवाद केंद्र अध्यक्ष अभय कुलकर्णी,कार्यवाह नितीन देशपांडे ,सातारा जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉक्टर अभय देशपांडे आणि कार्यवाह महेश शिवदे यांनी केले. याबाबत अधिक माहितीसाठी विशाल देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

