सातारा येथील पाठक हॉलच्या भाड्यामध्ये वाढ
सातारा
बुधवार १ जुलै २०२६ पासून सातारा येथील श्री छ प्रतापसिंह महाराज ( थोरले ) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलच्या भाडे दरात व्यवस्थापनाने वाढ केली आहे.
व्याख्यानाचा किंवा पुस्तक प्रकाशनाचा किंवा अन्य साहित्यिक कार्यक्रम घेण्यासाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीसाठी दर ३ तासाला २५००/- रुपये भाडे मोजावे लागणार आहे. शनिवार व रविवार या दोन दिवशी तीन हजार रुपये मोजावे लागणार आहेत. संगीत व कराओके कार्यक्रमाला आता दहा हजार रुपये भाडे तीन तासासाठी करण्यात आले आहे
पाठक हॉलच्या देखभाल सुविधा व वाढत्या प्रशासकीय खर्चाचं विचार करून ही भाडे दरवाढ करण्यात आल्याची सूचना नगर वाचनालयाच्या फलकावर लावण्यात आलेली आहे.

