नवीन पिढीने सजग साहित्याचे वाचन केले पाहिजे -संजय आवटे
प्रतिभा गौरव समाज प्रबोधन साहित्य संमेलन संपन्न
सातारा
नवीन पिढीने चिकित्सक पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. विवेकवादी आणि विज्ञानवादी सजग साहित्याचा अंगीकार केला पाहिजे.असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले
अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय आणि स्वागत समिती सदस्य यांच्या विद्यमाने आयोजित केलेले प्रतिभा गौरव समाज प्रबोधन साहित्य संमेलन संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.तेव्हा ते बोलत होते.
यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर अविनाश पोळ व उद्घाटक म्हणून डॉक्टर अनिमिष चव्हाण ,अश्वमेध चे संस्थापक रवींद्र भारती ,अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने ,स्वागत समिती अध्यक्षप्राध्यापक श्रीधर साळुंखे ,स्वागत समिती कार्यवाह वैदेही कुलकर्णी उपस्थित होते.
संजय आवटे पुढे म्हणाले,जे साहित्य माणसात सुसंवाद वाढवेल व जाती धर्मातील दरी कमी करेल ते साहित्य चांगल्या समाज उभारणीसाठी महत्त्वाचे ठरेल.
डॉक्टर अविनाश पोळ म्हणाले,संत साहित्याने आणि समतावादी साहित्याने मानवता धर्माची उभारणी केली आहे. साहित्य समाजबांधणी करते, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्गाने समाजाचे प्रबोधन करणे ही गरजेचे राहते.पाणीप्रश्न सोडवण्यासाठी समाजाची एकजूट ही गरजेची असते.
डॉक्टर अनिमिष चव्हाण म्हणाले,हे संमेलन साहित्य आणि समाज यांना एकत्रित करणारे व दोन्ही घटकांचे प्रबोधन करणारे ठरेल .अशा संमेलनाची लोकजागृतीसाठी गरज आहे.
प्रास्ताविकामध्ये डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले,अश्वमेध ग्रंथालय हे या संमेलनामधून समाज जागृती आणि समतावादी साहित्य आणि साहित्यिक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. डॉ आ.ह. साळुंखे ,डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी माणसाच्या मनाच्या वरील मळभ करण्याचे काम त्यांच्या साहित्यामधून केले.विवेक आणि चिंतन यातून चांगली समाज निर्मिती होते.हे संमेलन त्याची पाऊलवाट निर्माण करते आहे.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले.आभार डी एम मोहिते यांनी मानले.
याच संमेलनात ‘ मालिका मधून साहित्य मूल्य हरवते आहे का ? ‘ हा परिसंवाद आयोजित केला होता त्यामध्ये दिग्दर्शक मानसिंग पवार .अभिनेते बाळकृष्ण शिंदे. लेखक निलेश महिगावकर एडवोकेट सीमंतिनी निलकर यांचा सहभाग होता.मालिकांच्या निर्मिती पाठीमागे विषय निर्मिती बरोबरच टीआरपीचाही संबंध असतो लोकांना काय आवडते हे देण्याचा कल असतो.पूर्वी तेरा भागाच्या मालिका असायच्या त्या चांगल्या साहित्यावर आधारित असायच्या पण आता एक एक मालिका दोन दोन वर्षे चालतात त्यामुळे त्यात अवास्तव भर पडते आणि साहित्य मूल्य कमी होते.
सावित्रीबाई फुले यांच्या वरच्या मालिकेला टीआरपी मिळत नाही म्हणून बंद करावे लागणे हे समाजाचे दुर्दैव आहे.समाजातल्या वास्तव मालिकांमध्ये प्रतिबिंबित व्हायला पाहिजे त्या स्वप्नांची भूल असू नये अशा प्रकारचे विचार सर्व वक्त्यांनी व्यक्त केले.
परिसंवादाचे सूत्रसंचालन कविता प्रभुणे यांनी केले.
प्रास्ताविक प्रा श्रीधर साळुंखे यांनी केले आभार व्यंकट लोकरे यांनी मानले.
डॉक्टर अशोक भोईटे ,डॉक्टर मोहन सुखटणकर ,विजयकुमार क्षीरसागर, बाबुराव शिंदे ,डॉ शैलजा माने ,गौतम भोसले, स्वप्निल शिंदे, अनील वीर,
बाबुराव शिंदे, श्रीकांत कात्रे ,प्रदीप कांबळे ,डॉक्टर अदिती काळमेख ,सुनिता कदम,
निलेश पवार ,शुभम तंटक ,कांता भोसले, वासंती घाडगे , सुतेजा दांडेकर, अश्विनी कोठावळे ,मनीषा शिरटावले,रमाकांत परांजपे,सागर गायकवाड विजय कदम व इतर सर्व संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यांचीउपस्थिती होती.
फोटो ओळ
दीप प्रज्वलन करताना डॉ अनिमिष चव्हाण शेजारी संजय आवटे , अविनाश पोळ, डॉ राजेंद्र माने, रविंद्र भारती ,श्रीधर साळुंखे ,डी एम मोहिते, वैदेही कुलकर्णी

