‘सुकून’ कराओके ग्रुप नवोदितांसाठी व्यासपीठ- हेमंत कासार
‘सुकून’ म्युझिक संस्थेचा पहिला वर्धापनदिन साजरा
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकरी पतसंस्था यांचे सौजन्याने व सहकार्याने ‘सुकून’ या म्युझिक संस्थेचा पहिला वर्धापन दिवस कराओके गाण्याने दीपलक्ष्मी सभागृहात उत्साहाने साजरा झाला. श्री हेमंत कासार श्री विजय साबळे व सूकूनचे मार्गदर्शक व गायक श्री रवींद्र मोटे हे या प्रसंगीं विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. नवोदितांसाठी व हौशी गाणे कलाकारांसाठी व संगीत प्रेमींसाठी सुकून संगीत संस्था हे एक चांगले व्यासपीठ व संधी आहे व यात दीपलक्ष्मी संस्थेचा मोठा वाटा आहे असे श्री हेमंत कासार यांनी या प्रसंगी सांगितले. सूकूनचे प्रमुख रवींद्र मोटे यांनी सुकून संगीत संस्थेचा प्रथम वर्षाचा प्रवास विशद केला व आठवड्यातुन दोन दिवस कराओके गाण्याचे प्रशिक्षण मोफत दिले जाते असे सांगितले व साताऱ्यात कराओके संगीत चळवळ किती लोकप्रिय होत असल्याचे विशद केले. १९६० पासून आजपर्यंतची गाणी या प्रसंगी श्री रवींद्र मोटे, श्री प्रदीप कुलकर्णी, श्री आनंद पाठकजी व संगीता वाघमारे या संगीत कलाकारांनी उत्साहात गायली या प्रसंगी शहरातील संगीतप्रेमी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

