संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी


१५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा, २५००० दंड

मुंबई

Advertisement

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्याप्रकरणी संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे. राऊत यांना आता कोर्टाने १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे मेधा किरीट सोमय्या यांनी हा खटला दाखल केला होता, या खटल्या प्रकरणी आता हा निकाल कोर्टाने दिला आहे.
हा खटला माझगाव कोर्टात दाखल केला होता. राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा आरोप केले होते. या प्रकरणी गेल्या काही महिन्यापासून सुनावणी सुरू होती. दरम्यान, आता कोर्टाने निकाल दिला आहे. संजय राऊत यांना दोषी आढळल्याचे म्हटले आहे.या प्रकरणी संजय राऊत यांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.आयपीसी सेक्शन ५०० अंतर्गत ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मागील काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. आता आज हा निकाल कोर्टाने दिला आहे. संजय राऊत यांना दोषी सिद्ध करण्यात आले आहे. आता संजय राऊत या निर्णयाविरोधात पुढच्या कोर्टात जाऊ शकतात.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी त्यांच्यावर १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला आहे. शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!