साताऱ्यात लोककलेचा जल्लोष
बालरंगभूमी परिषद अध्यक्ष नीलम शिर्के सामंत यांची उपस्थिती
सातारा
बालरंग भूमी परिषद सातारा जिल्हा शाखेतर्फे लोककला महोत्सवाचे जल्लोषात सादरीकरण झाले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध शाळा आणि संस्थांनी सहभाग नोंदवला. या लोककला महोत्सवामध्ये समूह नृत्य, एकल नृत्य, समूहगीत, एकल गीत, एकलवादन अशा पाच प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये 220 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. साताऱ्यातील समर्थ मंदिर येथील दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथील दोन हॉलमध्ये या स्पर्धा चालू होत्या. सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत रंगमंचावरती बालकलाकारांनी नुसता लोककलेचा जागर केला. चिमुकल्यांचे सादरीकरण पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.बालरंगभूमी परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष नीलम शिर्के सामंत यांची या कार्यक्रमाला खास उपस्थिती होती
सातारा जिल्हा शाखेच्या अध्यक्षा रसिका केसकर यांनी नीलम ताईंचे स्वागत केले. साताऱ्याची ओळख असलेला अजिंक्यतारा, कासची फुले, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, साताऱ्याच्या मायेची उब असलेली शाल आणि साताऱ्याचे कंदी पेढे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
साताऱ्यातील जेष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे आणि संस्कार भारती सातारा जिल्हा अध्यक्ष दिलीप चरेगावकर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नीलम ताईंनी सर्व बालकलाकारांशी संवाद साधत त्यांच्याशी गप्पा मारल्या. नीलम ताईंच्या मुलांना आपलंस करण्याच्या या वेगळ्या शैलीमुळे सर्वच मुले त्यांच्याबरोबर रममाण झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन संदेश नारकर अध्यक्ष काळंबादेवी दैवज्ञ ज्ञाती फंड सातारा, सचिव धनंजय भुरके, सहसचिव आशिष निर्लेकर, राजा केमिकोचे विशाल पाटील, चकोर बेकरीचे सारंग गुजर, साताऱ्याचा प्रसिद्ध उद्योजिका कमला कलानी आणि बालरंगभूमी सातारा शाखेचे अध्यक्षा रसिका केसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री राजेंद्र आफळे व भानुदास गायकवाड यांनी गायन आणि वादन स्पर्धेचे परीक्षण केले. तसेच नेहा घाडगे आणि धैर्यशील उत्तेकर यांनी नृत्य स्पर्धेचे परीक्षण केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सातारा शाखेच्या कार्याध्यक्ष ॲड. रेशमा वळिंबे, कोषाध्यक्ष श्रुती दोशी, उपाध्यक्षा डॉ. शितल इनामदार आणि कुमार मोने, प्रमुख कार्यवाह ईशान केसकर, सहकार्यवाह मयुरेश देशपांडे, तसेच कार्यकारणी सदस्य गौरी हेंद्रे, स्वप्नाली वाकनीस, राजेश नारकर, मुग्धा देशपांडे, अनुजा प्रभुणे, राहुल केसकर, जमीर आतार, सानिका केसकर यांनी प्रयत्न केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
एकल वादन
सर्वोत्कृष्ट – कैवल्य दळवी
उत्कृष्ट – श्रीहरी लेवे
उत्तम – मनोमय भुरके
प्रशंसनीय – श्रेयस बर्गे
एकल गायन
सर्वोत्कृष्ट – स्वरांगी शेवडे
उत्कृष्ट – युगंधरा दाभाडे
उत्तम – सई जोग
प्रशंसनीय – रमा भट
समूह गायन
सर्वोत्कृष्ट – न्यू इंग्लिश स्कूल सातारा
उत्कृष्ट – सरस्वती विद्यामंदिर कराड
उत्तम – सौ. सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल
प्रशंसनीय – जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल सातारा
समूह नृत्य
सर्वोत्कृष्ट – नृत्यम नाट्यम अकॅडमी
उत्कृष्ट – साधना gems
उत्तम – डे. ए. सो. नविन मराठी शाळा सातारा
प्रशंसनीय – साधना स्टार्स

