बीसीए विद्यार्थ्यांचे सायबर सुरक्षा जनजागृती अभियान
कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा उपक्रम
सातारा
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बीसीए विद्यार्थ्यांनी क्विक हिल फाउंडेशन यांच्या समवेत ‘वनरक्षक ऑफिस व निर्भया पथक ‘सातारा येथे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबवला यामध्ये विद्यार्थ्यांनी अँड्रॉइड मोबाईल वरील सेटिंग, उपाय, फायदे, त्याचे नियम सुरक्षित लिंक, स्ट्रॉंग पासवर्ड, लिंक कशा ओळखायच्या व सायबर गुन्हे कोणते त्यापासून आपण आपले संरक्षण कसे करावे याविषयी चर्चा करून प्रात्यक्षिकाद्वारे जनजागृती केली.
समाजात गुन्हेगारीचे जणू जाळेच पसरले आहे .लहानांपासून वयोवृद्धांपर्यंतचे लोक यामध्ये गुरफटका चालले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व मदत करण्यासाठी बीसीए विद्यार्थी व क्वीक हिल फाउंडेशन यांनी खारीचा वाटा म्हणून स्तुत्य उपक्रम यशस्वीरित्या राबवला.त्याचे कौतुक होत आहे
