डॉ प्रसन्न दाभोळकर यांचे रविवारी व्याख्यान


उमेद जेष्ठ नागरिक संघातर्फे आयोजन

सातारा
येथील उमेद जेष्ठ नागरिक संघातर्फे प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न दाभोळकर यांचे व्याख्यान रविवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या आणि मानसोपचार या विषयावर डॉक्टर प्रसन्न दाभोळकर आपले विचार व्यक्त करणार आहेत अशी माहिती उमेद जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कानेटकर,उपाध्यक्ष गोपाळ खजुरे आणि कार्याध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी दिली. यावेळी दीपलक्ष्मी पतसंस्था चेअरमन शिरिष चिटणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

डॉक्टर प्रसन्न दाभोळकर प्रख्यात आणि जेष्ठ मानसोपचार तज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्तीनंतर ते परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त रामकृष्ण सेवा आश्रम सातारा येथे बालक संघाच्या कार्यात त्यांचा सहभाग असतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यामध्येही सहभागी असलेले डॉक्टर प्रसन्न दाभोळकर यांचे आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये सहापेक्षा जास्त केस रिपोर्ट प्रसिद्ध झाले आहेत.उमेद जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसह सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन उमेदतर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!