साताऱ्यात शनिवारी प्रेमगीतांचा बहारदार कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व सुकूनतर्फे आयोजन
सातारा:
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व अमरेंद्र रविंद्र मोटे सर द्वारा “सुकून” यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी व मराठी प्रेम गीते अवीट गोडीची हा सुमधुर नव्या जुन्या मराठी कराओके गाण्यांचा बहारदार कार्यक्रम शनिवार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी रोजी सायंकाळी 5.30 वा. दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून . मुकुंद फडके, विनायक भोसले, लक्ष्मण कदम, अग्नेश शिंदे व शिरीष चिटणीस, उपस्थित राहणार आहेत. यावेळी गायक कलाकार प्रशांत उत्तेकर, विनायक लोहार, सतीश पाटील, विकास नवरे, वैशाली केसकर, मार्गदर्शक रविंद्र मोटे सर आणि संगीता वाघमारे मॅडम विविध हिंदी व मराठी प्रेम गीते सादर करणार आहेत. सर्वांनी या विनामुल्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

