दीपलक्ष्मी पतसंस्था, माय बिट्सतर्फे श्रीकांत देवधर यांचा सत्कार
विशेष कार्यक्रमात निवेदिका चित्रा भिसे यांचाही गौरव
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि माय बिट्स कराओके स्टुडिओ यांच्यातर्फे दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये जेष्ठ नाट्यकर्मी श्रीकांत देवधर यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ निवेदिका,सूत्रसंचालक,गायिका चित्रा भिसे यांनाही गौरवण्यात आले. दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये मायबिट्स कराओके स्टुडिओ तर्फे गाणी मनातली हा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमात या दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीमा पाटील,शिरीष चिटणीस,राजकुमार निकम,वि ना लांडगे, मुकुंद फडके उपस्थित होते
मुकुंद फडके आणि शिरीष चिटणीस यांनी आपल्या भाषणात श्रीकांत देवधर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना आगामी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या ऍड रेशमा वाळिंबे यांच्या पुढाकाराने चित्रा भिसे यांचाही सन्मान करण्यात आला ऍड रेश्मा वाळिंबे यांनी चित्रा भिसे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊन त्यांच्या गाणी मनातली या कार्यक्रमामध्ये अल्ताफ मुल्ला., डॉक्टर वाय पी चव्हाण, संदीप इनामदार, मनोज सावंत, गणेश शिंदे, मिलिंद वैद्य, डॉक्टर लियाकत शेख, कल्याणी इनामदार, कलाचंद पाटील, सारिका हेंद्रे, संगीता सपकाळ, चित्रा भिसे ,वनिता कुंभार यांनी विविध गाणी सादर केली
कार्यक्रमाची संकल्पना डॉक्टर लियाकत शेख यांची होती अक्षता व सचिन शेवडे यांनी ध्वनी संयोजनाची बाजू सांभाळी कार्यक्रमाचे खुसखुशीत निवेदन चित्रा भिसे यांनी केले
फोटो ओळ
वाढदिवसानिमित्त श्रीकांत देवधर यांचा सत्कार करताना शिरीष चिटणीस, शेजारी डावीकडून राजकुमार निकम सीमा पाटील ऍड रेश्मा वाळिंबे डॉक्टर लियाकत शेख मुकुंद फडके आणि चित्रा भिसे

