सुमनांजली लाइव्ह मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
माय बिट्स स्टुडिओ कलावंताचे सादरीकरण
सातारा
माय बिट्स स्टुडिओ कलावंताची सुमनाजली वाद्यवृंदासह लाइव्ह मैफिल अभूतपूर्व गर्दीत संपन्न झाली.गायिका सुमन कल्याणपूर यांच्या कला प्रवासातील किस्से आठवणी आणि सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली.
ओंकार प्रधान रूप गणेशाचे या भक्तिगीताने सुरुवात झाली.. कशी करू स्वागता, ये किसने गीत छेडा, दिल ने फिर याद किया अशा कितीतरी अवीट गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
प्रारंभी उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके आणि संगीतप्रेमी , शास्त्रीय संगीताचे अभ्यासक संजय दीक्षित , माय बिट्स चे संस्थापक डॉक्टर लियाकत शेख यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी हार्मोनियम संगीत विशारद भारतातून पहिल्या क्रमांकाने विजयी स्वरा किरपेकरचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात सुमनाजली या लाइव्ह पहिल्याच कार्यक्रमाची संकल्पना डॉ शेख यांनी विशद केली.
संजय दीक्षित यांनी डॉ शेख आणि सर्व गायकांच्या या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. श्री मुकुंद फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्या गायकीची वैशिष्ठे मांडत वाद्यवृंदला शुभेच्छा दिल्या.

वादक (हार्मोनियम) वैभव साने,( तबला) नितीन पंडित आणि आर्चिस साने (साईड रिदम यांचा सत्कार केला.वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित, सीमा रजपूत, श्रुती शहा, सारिका हेंद्रे, चित्रा भिसे,गणेश शिंदे आणि डॉक्टर लियाकत शेख या गायकांनी निवडक गाण्यातून रसिकांची उत्तम दाद मिळवली. कार्यक्रम यशस्वितेसाठी कलाकार फोटो स्टुडिओचे शाहरुख शेख आणि संदिप इनामदार तसेच माय बिट्स इतर सभासदांचे विशेष सहकार्य लाभले
कार्यक्रमाचे निवेदन आपल्या वैशिष्ठ पूर्ण शैलीत सुमन कल्याणपूर यांचा कला प्रवास उलगडत चित्रा भिसे यांनी केले.कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्था सचिन आणि अक्षता शेवडे यांची होती.
कार्यक्रमास सातारा शहरातील कलाप्रेमी , अनेक गायक यांनी हजेरी लावली.

