अनुवादित सॅफ्रॉन स्वोर्डस ग्रंथाचे प्रकाशन
पुणे
विख्यात इतिहास संशोधक लेखिका मानोशी सिन्हा लिखित सॅफ्रॉन स्वोर्डस या ग्रंथाच्या मिलिंद रथकंठीवार यांनी केलेल्या मराठी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन निवृत्त दिवाणी न्यायधीश डॉ श्रीराम करंदीकर यांचे हस्ते आसाम येथील काझीरगंगा स्थित डी कोर्टयार्डच्या प्रांगणात मोठ्या थाटात करण्यात आले .ह्यावेळी स्टेट बँकेचे निवृत्त उपमहा व्यवस्थापक अजय जोशी हे अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत रथकंठीवार ह्यांनी केले.सुमेधा जोशी ह्यांनी आभार मानले.
ह्या प्रसंगी भाषांतरकार मिलिंद रथकंठीवार यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितले की,”भारतीय इतिहासाच्या ग्रंथातील अनेक पृष्ठ गहाळ झालेली आहेत.त्यातील काही व्यक्तिमत्वे ही लार्जर दॅन लाईफ अशी रंगवली आहेत तर काहींची नावे जाणून बुजून दुर्लक्षित ठेवलेली आहेत.खरा इतिहास नवीन पिढीसमोर येणे गरजेचे आहे त्या दृष्टीने तशी इतिहासात ठरवलेली पाने शालेय अभ्यासक्रमात ती शिकवली जाणे गरजेचे आहे.या दृष्टीने मानोशी सिन्हा यांची इतिहासाविषयी ग्रंथसंपदा ही सर्व भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी यासाठी मी मराठीत अनुवाद करून उपलब्ध करून दिले आहे ही माझ्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
अध्यक्षीय समारोप करतांना अजय जोशी यांनी मिलिंद रथकंठीवार ह्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असून लेखक,चित्रकार,भाषांतरकार, गायक,आहेत.व्यक्ती एक अभिव्यक्ती अनेक या उक्ती चे सार्थ करणारे मिलिंद रथकंठीवार यांचे व्यक्तिमत्व आहे”असे प्रतिपादन केले.
फोटो ओळ
सॅफ्रॉन स्वोर्ड या मानोशी सिन्हा लिखित व मिलिंद रथकंठीवार अनुवादित ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी निवृत्त न्यायधीश डॉ श्रीराम करंदीकर,अजय जोशी,मिलिंद रथकंठीवार,प्रशांत रथकंठीवार,स्थळ आसाम येथील डी कोर्ट यार्ड,काझीरंगा

