साताऱ्यात गुरुवारी स्वर तिरंग्याचे कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था व स्वरविलास यांच्यातर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व स्वर विलास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह येथे स्वर तिरंग्याचे हा देशभक्तीपर मराठी, हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. देशाच्या 79 व्या स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने संगीतातून तिरंग्याला मानाचा मुजरा या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.या कार्यक्रमामध्ये विलास जावळे,शुभांगी गुरव आणि संतोष वाघ हे कलाकार गाणी सादर करणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत कात्रे,नितीन देशपांडे ,मुकुंद फडके, शिरिष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्रकुमार निकम करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!