कै भास्करराव माने अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर
पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक 23 ऑगस्टला होणार
सातारा
दरवर्षी अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा यांच्यामार्फत कै भास्करराव माने स्मृत्यर्थ उत्कृष्ट ग्रंथांना अक्षर गौरव साहित्य पुरस्कार दिले जातात.
2025 सालात प्रकाशित ग्रंथांना यावर्षीचे अक्षर गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे .या पुरस्कारांची माहिती ग्रंथालयाचे संस्थापक डॉ रवींद्र भारती व ग्रंथालयाचे अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने यांनी दिली .
या पुरस्कारांचे वितरण 23 ऑगस्ट २०२६ रविवार रोजी ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे आणि कवी व गझलकार धनंजय तडवळकर या
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कै भास्करराव माने स्मृत्यर्थ राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ’अक्षरगौरव ‘ साहित्य पुरस्कार
२०२५ (अडीच हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह )
१ )धुराच्या सैल वेलांट्या – कवी चंद्रकांत पोतदार
२)पीळ -लेखक दिवाकर कृष्ण आचार्य -कादंबरी
कै भास्करराव माने, स्मृत्यर्थ अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२५
(एक हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह )
१)ऊन सावलीच्या शोधात -बा बा कोटंबे – कादंबरी
२)ऋतुरंग – जे डी पराडकर – ललित गद्य संग्रह
3 )अवतरण चिन्ह – प्रवीण बोपुलकर –
कवितासंग्रह
४)गिरीश प्रभुणे जसे कळले तसे -रवींद्र गोळे -चरित्रात्मक
५) दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर कर्तृत्वाचा एक शोध – रवींद्र बेडकीहाळ
– संशोधन,लेखन व संपादन
कै भास्करराव माने स्मृत्यर्थ अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२५ -सातारा जिल्हा लेखक
(एक हजार रुपये रोग व सन्मान चिन्ह )
१)अंतर्नाद – अश्विनी कोठावळे -कवितासंग्रह
२)फुलांचे जंगली प्रदेश – सीमा नुलकर –
प्रवास वर्णन
३ )गाव पांढरीच्या वैभवखुणा – अशोक शिंदे
– ललितगद्य
४)देवाचिये द्वारी – वासंती घाडगे -प्रवास वर्णन
५)प्राचीन सातारा – साक्षी महामुलकर –
इतिहास
डॉक्टर श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ अक्षरगौरव पुरस्कार २०२५ आरोग्य विषयक ग्रंथासाठी
(एक हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह )
झुंज कॅन्सरशी – मराठी अनुवाद जयराम धोंगडे

