जयवंत दळवी यांच्या साहित्यावर गुरुवारी कार्यक्रम
साहित्यातील प्रीतीच्या विविध छटा उलगडणारा आविष्कार
सातारा
आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यातील प्रीतीच्या विविध छटा उलगडणारा आगळा वेगळा आविष्कार कार्यक्रम गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि विवेचन डॉक्टर निर्मोही फडके यांनी केले असून वंदना प्रवीण गुजरे आणि योगेश केळकर हे अभिवाचक आणि दिग्दर्शक आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुकुंद फडके कार्यक्रमाचे संयोजन करणार आहेत.तरी सर्व सातारकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री,दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस,आम्ही पुस्तक प्रेमी चे समन्वयक श्रीराम नानल यांनी केले आहे.

