जागतिक योग दिनानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा


योगविद्या धाम सातारा संस्थेच्या वतीने आयोजन
सातारा
येथे जागतिक योग दिनानिमित्त योगविद्या धाम सातारा संस्थेच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय “योग” असा असून, योगाचे महत्त्व आणि त्याचे विविध पैलू रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.
ही स्पर्धा १८ वर्षांवरील नागरिकांसाठी खुली असून, आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांनी रांगोळी ‘योग’ या विषयावर आधारित काढणे आवश्यक आहे. तसेच रांगोळी अडीच बाय अडीच फूट या आकारात काढायची असून, लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वतःसोबत आणायचे आहे. रेडीमेड स्टेन्सिल किंवा छापील डिझाइन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. रांगोळीत अक्षरे किंवा स्लोगन लिहिण्यास परवानगी नाही. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
ही स्पर्धा मारवाडी सेवा संघ, सोमवार पेठ, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा येथे रविवार, २१ जून २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
योगप्रेमी आणि कलाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी 88065 11777 या क्रमांकावर संपर्क साधावा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!