मधुसूर राज्यस्तरीय संगीत स्पर्धा २२,२३ ऑगस्टला


सातारा
स्व. नानासाहेब द्रविड स्मरणार्थ मधुसूर राज्यस्तरीय संगीत स्पर्धा २०२६ दिनांक २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ रोजी शाहू कला मंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा २०२६ आणि राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत गायन स्पर्धा २०२६ अशा दोन विभागात स्पर्धा होणार आहे,अशी माहिती संयोजक ऍड अमित द्रविड यांनी दिली. हे स्पर्धेचे पाचवे वर्ष असून दरवर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फॉर्म स्विकारण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०२६ आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी द्रविड ऑफिस 596 गुरुवार पेठ कमानी हौदाजवळ सातारा येथे संपर्क साधावा.
गुगल प्रवेश फॉर्म लिंक : https://sprl.me/madhusur2026


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!