आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रगत प्राणायाम शिबिर


सातारा :
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग विद्या धाम, सातारा संस्था आणि दै मुक्तागिरीच्या मुक्तांगण व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगत प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २२, २३ आणि २४ जून २०२६ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत गुरुवार बाग, सातारा येथे होणार आहे.
या शिबिरात प्राणायामाचे विविध प्रकार, श्वसन तंत्र आणि आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिराचे मार्गदर्शन प्रसिद्ध धावपटू मार्गदर्शक व श्वसन तंत्र प्रशिक्षक मिलिंद हळबे हे करणार आहेत.
प्राणायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, एकाग्रता व स्मरणशक्ती सुधारणा, मन शांत राहणे, हृदय गती नियंत्रण, फुफ्फुसांची क्षमता वाढणे तसेच तणाव कमी होऊन चांगली झोप लागणे असे विविध फायदे होतात, अशी माहिती योगविद्या धाम सातारा संस्थेच्या अध्यक्षा शैलजाताई ठोके यांनी दिली.
सर्व वयोगटातील नागरिकांसाठी हे शिबिर खुले असून सहभाग पूर्णतः विनामूल्य आहे. सहभागी होताना योगा मॅट, पाण्याची बाटली, नॅपकिन आणि सैलसर कपडे आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९९२२८४५८३ / ९८५०८ ८०२५० या क्रमांकांवर संपर्क साधावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!