गर्लफ्रेंडच्या स्वागतासाठी चक्क पैशांचा गालिचा
दुबईतील मोठ्या व्यापाऱ्याकडून श्रीमंतीचे प्रदर्शन
दुबई
प्रेमाच्या भव्य प्रदर्शनाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरलहोत आहे. ज्यात दुबईतील मोठा व्यापारी सर्गेई कोसेन्को याने आपल्या प्रेयसींच्या भव्य स्वागतासाठी पैशांचा गालिचा अंथरलेला पहायला मिळतो.
कोसेन्को याने कार्पेटऐवजी, त्याच्या प्रेयसींना खाली अतरण्यासाठी पैशांची अक्षरश: शिडी हॅलिकॉप्टरच्या बाजूला लावलेली पहायला मिळते. इंस्टाग्रामवर मिस्टर थँक यू म्हणून सर्गेई कोसेन्को याची ओळख आहे. कोसेन्को अनेकदा त्याच्या वैभवशाली जीवनशैलीची झलक शेअर करत असतो. व्हायरल क्लिपमध्ये त्याची प्रेयसी हेलिकॉप्टरमधून उतरताना दाखवली आहे, ती नोटांच्या बंडलवर कोसेन्कोच्या बाजूने चालत येताना दिसत आहे
