संस्कार भारतीतर्फे शनिवारी कथालेखन ,कथाकथन कार्यशाळा


योगेश सोमण,प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन लाभणार
सातारा
संस्कार भारती जिल्हा समिती सातारा यांच्या वतीने व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवोदित तसेच महाविद्यालयीन लेखकांसाठी शनिवार दिनांक 29ऑगस्ट 2026 रोजी कथालेखन ,कथाकथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.कथा लेखनाचा आकृतीबंध तसेच कथेचे सादरीकरण या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.

Advertisement

 


कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदचे अध्यक्ष योगेश सोमण आणि सुप्रसिद्ध लेखक , अभिनेते प्रमोद पवार उपस्थित राहणार आहेत. योगेश सोमण आणि प्रमोद पवार या अनुभवी कलाकारांकडून कार्यशाळेत सहभागी सदस्यांना मिळणारे मार्गदर्शन त्यांच्या लेखन संदर्भातील भवितव्य व कथाकथन या सादरीकरण प्रकारातील कौशल्य वाढवण्यासाठी उपयोगी पडेल.
कार्यशाळा शनिवार दिनांक 29ऑगस्ट 2026 रोजी शाहू सभागृह कला व वाणिज्य महाविद्यालय कोटेश्वर मैदानासमोर दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे.
कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती शंभर रुपये आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी
मुकुंद फडके 9552593297
संजीव आरेकर 8149912687
दिलीप चरेगावकर 9921958042
रसिका केसकर 9420630374
यांच्याशी 27 ऑगस्ट पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!