सोमवारी सुमन कल्याणपुर लाईव्ह मैफल
दीपलक्ष्मी पतसंस्था व स्वस्तिश्री ग्रुपतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व स्वस्तिश्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या मराठी हिंदी गाण्यांची लाईव्ह मैफिल आयोजित करण्यात आली आहे हा कार्यक्रम संगीतकार राजेंद्र रानडे व उज्वला करंबेळकर यांनी प्रस्तुत केला असून यावेळी गायक कलाकार उज्वला करंबेळकर,श्रेया केळकर, अतुल शेलार,डॉ दत्तात्रेय बारटक्के गाणी सादर करणार आहेत यावेळी सिंथेसायझरवर राजेंद्र रानडे आणि तबल्यावर शाम नाडकर्णी साथ देणार आहेत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस, धनंजय फडत,रे काका पाटील, डॉ सारिका देशपांडे डॉक्टर हेमलता गोखले उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे निवेदन जेष्ठ पत्रकार व चित्रपट अभ्यासक मुकुंद फडके करणार आहेत सर्वांनी या लाईव्ह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे

