आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे निमंत्रितांचे साहित्य संमेलन रविवारी


दिवसभर विविध साहित्यविषयक कार्यक्रमांची मेजवानी
सातारा
येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह यांच्यातर्फे चतुर्थ साहित्य संमेलन वाचनातून समृद्धी या संकल्पनेखाली रविवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये हॉटेल निवांत यवतेश्वर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे डॉक्टर संदीप श्रोत्री,शिरीष चिटणीस, श्रीराम नानल, विनोद कुलकर्णी, मुकुंद फडके व श्रीकांत कात्रे यांनी दिली. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार अभिजीत बेल्हेकर असणार असून अध्यक्षस्थानी लेखक आणि राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे असणार आहेत.हे संमेलन फक्त निमंत्रितांसाठी आणि आम्ही पुस्तकप्रेमी समूहाच्या सदस्यांसाठी आहे.संमेलन स्थळाला प्रा शिवाजीराव भोसले साहित्यनगरी नाव देण्यात आले असून व्यासपीठाला मधू नेने यांचे नाव देण्यात आले आहे
या संमेलनामध्ये समूह सदस्यांचे कवी संमेलन तसेच, साहित्यातील शंभरी पार केलेले साहित्यिक प्रा शिवाजीराव भोसले, नारायण सुर्वे, सुनीताबाई देशपांडे, रवींद्र पिंगे, शंकर पाटील, द मा मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्याविषयी विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच वाचन संस्कृती पुस्तकातून स्क्रीनकडे या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!