साताऱ्यात शनिवारी यादो की मेहफिल कार्यक्रम


साहिर लुधियानवी आणि शैलेंद्र यांची गाणी होणार सादर
सातारा
सरगम ग्रुप सातारा प्रस्तुत यादो की महफिल हा गीतकार साहिर लुधियानवी आणि शैलेंद्र यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम शनिवार दिनांक 14 रोजी सायं.५-३० वाजता शाहू कला मंदिर सातारा येथे आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमात प्रशांत चव्हाण, डॉ. सुनील पटवर्धन, संतोष वाघ, नासिर सय्यद, के गौरी, मधुराणी मोकल ( पाटील ) आणि अनुराधा पंडितराव हे कलाकार स्वर साज चढवणार आहेत तर वादक म्हणून अनिल खैरनार, रोहन मोकल, प्रणव कालगुड, तेजस मोकल, केदार गुळवणी, मिलिंद देवरे, स्वरा किरपेकर आणि चैतन्य पटवर्धन हे साथ संगत करणार आहेत. कार्यक्रमाचे लेखन आणि संयोजन हे बाळासाहेब बाबर यांचे असून सहसंयोजन हे संतोष वाघ यांचे आहे. निवेदनाची जबाबदारी ऍड रेश्मा वाळिंबे सांभाळणार आहेत. ध्वनी व्यवस्था ही नाना साबळे यांची असून चित्रीकरण हे साईश क्रिएशन यांचे आहे. सदर कार्यक्रम सर्व सातारकर रसिकांना मोफत असून सर्व रसिकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!