गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर


7 मे 2025 रोजी वाई येथे होणार पुरस्कारांचे वितरण
सातारा
एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे वतीने आदर्श कामगार पुरस्का2025 जाहीर करण्यात आले आहेत. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे वतीने दरवर्षी देण्यात येणारा आदर्श कामगार पुरस्कार सोहळा यावेळी महर्षी कर्वे शिक्षण संस्था कन्या शाळा वाई येथे आयोजित करण्यात आला असून या वेळी विवेक कुलकर्णी ,प्रेसिडेंट ऑपरेशन्स गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड( पुणे) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रविंद कुलकर्णी व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड आणि युवराज थोरात साहेब एच आर आणि आय आर गरवारे टेक्निकल फायबर्स लि.वाई वाई यांचे प्रमुख उपस्थितीत आणि गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा अध्यक्ष जयंत देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे .

Advertisement


यावेळी रोहिदास शिवाजी कुराडे अल्फा लावल प्रा. लि. जुनी एमआयडीसी सातारा , अनिकेत कृष्णात भोसले ,सांगली वैभव को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा सातारा, दत्तात्रय खंडू जाधव ,गरवारे टेक्निकल फायबर्स लि. वाई, संजय लक्ष्‍मण खंडागळे, गोदरेज अँड बॉईज मॅन्यु.कं.लि.(गोदरेज मोटार सोल्युशन) शिंदेवाडी , दत्तात्रय ज्ञानोबा पवार ,गोदरेज अँड बॉईज मॅन्यू.कं. लि. (गोदरेज मोटार सोल्युशन) शिंदेवाडी, ता.खंडाळा, जि. सातारा , सचिन गुलाबराव पेटकर गरवारे टेक्निकल फायबर्स लि. वाई आदींना आदर्श कामगार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा संस्थापक अध्यक्ष रघुवीर आपटे, दिलीप चरेगावकर , गोपाल खजुरे यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या रोपाचे रूपांतर सुंदर वटवृक्षात झाले असून त्याची कामगिरी पाहता गुणवंत कामगार प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानचे सहकारी यांची प्रगती निश्चितच यशदायक आणि कीर्तीदायक असल्याचे जनमानसात बोलले जात आहे .
या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष,अमृत साळुंखे दादासाहेब काळे सरचिटणीस, संजय गिरी खजिनदार आणि सर्व कार्यकारणी यांचे वतीने करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!