सोशल मीडिया – मित्र की शत्रू?


साताऱ्यात ‘डिटॉक्सिफिकेशन’ विषयावर व्याख्यान

Advertisement

सातारा
“सोशल मिडिया तुमचा मित्रही ठरू शकतो आणि शत्रूही… फरक फक्त वापराचा!”आहे या या प्रभावी संदेशासह साताऱ्यातील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या बँक मॅनेजमेंट विभागात आज “सोशल मिडिया डिटॉक्सिफिकेश” या विषयावर विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
हे सत्र लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात पार पडले. प्रमुख मार्गदर्शक सौ. मृणालिनी रामचंद्र के. होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. बी. एस. भोसले यांनी केले, तर प्राचार्य डॉ. जी. व्ही. जाधव व डॉ. व्ही. एम. कुंभार यांनी प्रमुख वक्त्यांचा सत्कार करून सत्राचे उद्घाटन केले.
सौ. मृणालिनी यांनी सोशल मिडियाचा अति वापर पाच ज्ञानेन्द्रिये, मेंदूतील संप्रेरक आणि दैनंदिन जीवनशैलीवर कसा परिणाम करतो, हे स्पष्ट केले. काही गोष्टींची काळजी घेतल्यास ताणतणाव कमी होणे, मानसिक आरोग्य सुधारणा, कार्यक्षमता वाढ आणि उत्तम झोप यासारखे फायदे मिळू शकतात, असे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह सांगितले. विद्यार्थिनींनी सत्रात उत्साहाने सहभाग घेतला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जाधव यांनी सोशल मिडियाचा समतोल व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. शेवटी सौ. रोहिणी दहिंजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सत्रातून विद्यार्थिनींना सोशल मिडियाच्या अति वापराचे दुष्परिणाम समजावून, आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचा ठोस संदेश मिळाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!