दुरितांचे तिमिर जावो


न्यूजमंडी/पॉझिटिव्ह

केनियातील या गावामध्ये एकही पुरुष नाही

बलात्कार पीडित महिलांनी वसवलेल्या गावात पुरुषांना नो एन्ट्री

नैरोबी

महिला आणि पुरुषांनी एकत्र नांदणे हा आधुनिक काळातील सामाजिक व्यवस्थेचा भाग असला तरी दक्षिण आफ्रिकेतील केनया या देशामध्ये एक असे गाव आहे ज्या गावामध्ये एकही पुरुष नाही उमोजो नावाचे हे गाव जाणीवपूर्वक वसवण्यात आले असून या गावांमध्ये पुरुषांना नो एन्ट्री आहे गावातील सर्व प्रमुख कारभार महिलांच्याच हातात असून सरपंच आणि इतर अधिकारीही महिला आहेत या गावातील महिलांना जर पुरुषांशी संबंध ठेवायचा असेल तर त्यांना गावाबाहेर जावे लागते पण कोणत्याही पुरुषाला गावामध्ये प्रवेश दिला जात नाही पुरुषाशी संबंध ठेवल्यामुळे जर महिला गरोदर राहिल्या आणि पुरुष मूल जन्माला आले तर त्याला गावात ठेवले जाते पण हा मुलगा अठरा वर्षाचा होताच त्याला गावातून बाहेर काढले जाते या गावामध्ये एकूण 50 कुटुंबे असून प्रत्येक कुटुंबाचा प्रमुख एक महिलाच आहे या गावामध्ये कोणी पुरुषाने चोरून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटक केले जाते आणि त्याला शिक्षाही केली जाते या गावात पुरुषांना नो एंट्री असल्यामुळे वैवाहिक संबंध हा विषय तेथे नाही पण कुटुंब वाढवण्यासाठी महिलांना गावाबाहेर जाऊन पुरुषांशी संबंध ठेवण्याची परवानगी देण्यात येते 1990 मध्ये केनियातील बलात्कार पीडित 15 महिलांनी हे गाव वसवले होते केनिया आणि ब्रिटनमधील कराराप्रमाणे ब्रिटिश लष्कर अनेक वेळा केनियामध्ये येते तेव्हा काही ब्रिटिश सैनिकांनी महिलांवर बलात्कार केला होता या पीडित महिलांनी हे गाव वसवले असून या गावांमध्ये पुरुषांना प्रवेश नाही असा निर्णय त्यांनीच घेतला आहे आता या गावामध्ये बलात्कार पीडित महिलांप्रमाणेच घटस्फोटीत महिला आणि विधवा महिलाही राहण्यासाठी येऊ लागल्या आहेत

न्यूजमंडी/ज्ञानकोश
नेहरू यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
अगदी सुरुवातीच्या काळापासूनच पं. नेहरू हे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले आणि त्यांच्या या पार्श्वभूमीचा फायदा त्यांना स्वतः प्रशासनात असताना झाला. समाजातील विविध घटकांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यानुसार उपाययोजना आखण्यासाठी त्यांचे अनुभव त्यांच्या कामी आले. पं. नेहरू हे राजकारणात एक कार्यकर्ताच म्हणून आले आणि हळूहळू एक एक आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केलं.सर्वाधिक वेळा तुरुंगवास भोगलेले पंतप्रधान असा देखील त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकूण 9 वेळा तुरुंगात जावं लागलं होतं.1920 मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं होतं. एक उच्च विद्याविभूषित तरुण शेतकरी आंदोलनात उतरतोय हे पाहण्याची भारताची काही ही पहिलीच वेळ नव्हती. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या महात्मा गांधींनी नीळच्या शेतकऱ्यांसाठी चंपारणचा सत्याग्रह केला होता. पण अनेकांना हा प्रश्न पडू शकतो की पं. नेहरूंनी आपल्या आंदोलनांची सुरुवात या आंदोलनाने का केली असावी?याचं उत्तर आपल्याला त्यांच्या आत्मचरित्रात मिळतं, नेहरू लिहितात, ‘1921 हे वर्षं आम्हा सर्वांसाठी एकमेवाद्वितीयच होतं. राष्ट्रवाद, राजकारण, धर्म, गूढता आणि धार्मिक कट्टरतावादांचं एक वेगळंच मिश्रण या काळात पाहायला मिळालं. या सर्व गोष्टींच्या पाठीमागे आपल्या देशातील कृषी समस्या आणि मोठ्या शहरात कामगार वर्गाच्या चळवळीचा जो उदय झाला त्यात पाहायला मिळतं.’
पं. नेहरू यांचे केवळ स्वातंत्र्यालाच प्राधान्य नव्हते तर सर्वच वर्गांच्या उत्थानाबाबत कळवळा होता त्यातूनच त्यांनी कामगार आणि शेतकरी चळवळीत स्वांतत्र्यपूर्व काळात सहभाग घेतल्याचं समजतं..

Advertisement

न्यूजमंडी/सुविचार
1. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते.
2. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.

3. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं

 

न्यूजमंडी/विनोद

उत्तर

लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न:

उत्तर फक्त हो किंवा

नाही मध्ये द्यावे,

आता तुमच्या बायकोने तुम्हाला

मारणे बंद केले आहे का?

 

बाहेर झोपा

बायको: माझी मैत्रीण येणार आहे,

दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..

नवरा: बरं.. पण वचन दे,

माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…!

 

गरीब

तुमचे वडील गरीब असतील,

तर ते तुमचं दुर्भाग्य..

पण तुमचा सासरा गरीब असेल,

तर तो तुमचाच गाढवपणा…!

 

न्यूजमंडी/खाद्ययात्रा
मावा करंजी

साहित्य
सारणासाठी:
एक कप केशरी पेढे कुस्करुन 2 टेबलस्पून तूप 1/2 कप बारीक रवा 1/2 कप मिक्स ड्रायफ्रुट बारीक करुन पिठीसाखर आवडीनुसार.वेलची पावडर 1/4 कप बुरा खोबरे
आवरणासाठी:
2 कप मैदा 1/2 कप साजूक तूप मीठ चवीनुसार पाणी 12.
पाकासाठी
1 कप साखर साखर बुडेल इतके पाणी तेल किंवा साजूक तूप तळायला केशर काड्या
कृती

प्रथम एका परातीत मैदा द्या त्यामध्ये तूप मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. तूप सगळे पिठाला चोळून घ्या. आणि थोडे थोडे पाणी घालत घट्ट गोळा भिजवून ठेवा.आता यावर ओलसर,दमट कपडा घालून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा.आता एका वाटी मध्ये पेढे घेऊन चांगले कुस्करून ठेवा.एका कढईत तूप घालून त्यामध्ये बारीक रवा गुलाबीसर रंगावर येई पर्यंत भाजून घ्या आणि गार करा. तसेच खोबरे भाजून गार करा.गार झाल्यावर रव्यामध्ये कुस्करलेले पेढे, खोबरे ड्रायफ्रूट पावडर,चवीनुसार पिठीसाखर,वेलची पावडर घालून सारण व्यवस्थित एकजीव करा आणि बाजूला ठेवा.आता भिजवलेला गोळा परत खूप मळून घ्या आणि त्याचे लहान गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटा आणि त्यामध्ये सारण भरून गुजिया किंवा करंजी बोटाने व्यवस्थित चेपून घट्ट बंद करा.नंतर यांना सुंदर मुरड घालून मावा गुजिया तयार करून घ्या आणि वर ओलसर कापड घालून झाकून ठेवा.आता एका कढईत तेल तापत ठेवा आणि दुसरीकडे साखरेचा एक तारी पाक करून घ्या. पाक तयार झाला कि त्यात केशर घालून व्यवस्थित एकजीव करा.तेल तापले की मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्याआणि कोमट पाकामध्ये थोड्यावेळ ठेवून नंतर पाक निथळून ताटात काढून ठेवा.तयार झाल्या आपल्या स्वादिष्ट मावा करंजी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!