साताऱ्यात रविवारी कृष्णा परिक्रमेवर डॉक्टर वारुंजीकर यांचे व्याख्यान
उमेद जेष्ठ नागरिक संघातर्फे आयोजन
सातारा
येथील उमेद जेष्ठ नागरिक संघातर्फे रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे डॉ मुरलीधर वारुंजीकर यांचे कृष्णा परिक्रमा या विषयावर व्याख्यान व स्लाईड शो होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.

डॉक्टर मुरलीधर वारुंजीकर हे साताऱ्यातील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ असून 2021 मध्ये त्यांनी कृष्णा परिक्रमा पूर्ण केली होती. या परिक्रमेची माहिती व अनुभव ते या व्याख्यानामध्ये देणार आहेत.हा कार्यक्रम उमेद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी आहे अशी माहिती उमेद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कानेटकर,उपाध्यक्ष गोपाळ खजुरे,कार्याध्यक्ष दिलीप चरेगावकर ,चिटणीस विजय फडणीस यांनी दिली आहे.

