डॉ.नीलेश ओक यांचे रविवारी व्याख्यान
सातारा
भारतीय संस्कृतीतील अद्भुत ज्ञान, तंत्रज्ञान आणि पुरातन भारतीय संस्कृती या विषयावर प्रसिद्ध संशोधक आणि लेखक नीलेश नीलकंठ ओक यांचे व्याख्यान व स्लाईड शो रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पारसनीस कॉलनीतील सभागृहात होणार आहे.महाभारत व रामायण यांचा खगोल शास्त्रीय दृष्टीकोनातून कालखंड हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे
एक लेखक, मूलभूत संशोधनात रमणारे संशोधक, उत्तम भाषण देणारे वक्ता म्हणून डॉ नीलेश नीलकंठ ओक लोकप्रिय आहेत. जगभर प्रवास करीत ते विश्वविद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. आणि तसाच संवाद श्रोत्यांशीही साधतात. ते वाचकांना/श्रोत्यांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत ज्ञान, तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या पुरातनतेचे भान आणून देऊ इच्छितात. त्यामुळे लोकांना आपल्या संस्कृतीचे खरे आणि पूर्ण भान येईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी केले आहे.

