गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद:अरविंद कुलकर्णी


आदर्श कामगार पुरस्कार वितरण समारंभ वाई येथे संपन्न

वाई
गुणवंत कामगार प्रतिष्ठान कामगारांसाठी करत असलेले कार्य काैतुकास्पद आहे, असे प्रतिपादन गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी यांनी केले
गुणवंत कामगार प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारा आदर्श कामगार पुरस्कार वितरण समारंभ वाई येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते
.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे जनरल मॅनेजर युवराज थाेरात, तसेच गुणवंत कामगार प्रतिष्ठान संस्थापक रघुवीर आपटे, गाेपाळ खजुरे, दिलीप चरेगावकर, अध्यक्ष जयंत देशपांडे, माजी अध्यक्ष इकबाल काझी, सरचिटणीस दादासाहेब काळे उपस्थित होते
अरविंद कुलकर्णी म्हणाले,सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत गरवारे कंपनीकडून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्य केले जात आहे.नव्याने सुरू करण्यात आलेल्या गरवारे युवा विकसन केंद्रच्या मार्फत तरूण तरूणींना विविध व्यावसायीक काेर्सेसचे माेफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नाेकरी व स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासही सहकार्य केले जात आहे.
यावेळी गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे जनरल मॅनेजर युवराज थाेरात यांनी प्रतिष्ठानचे कार्य काैतुकास्पद आहे असे सांगितले
महाराष्ट्र गीत सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आला. माजी अध्यक्ष इकबाल काझी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक दिलीप चरेगावकर यांच्याहस्ते मानपत्र देऊन गाैरविण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष जयंत देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. माजी अध्यक्ष इकबाल यांनी नवनिर्वाचित अध्यक्षपदाची सूत्रे जयंत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी आदर्श कामगार पुरस्कार २०२५ पुरस्कार प्राप्त राेहिदास कुराडे (आल्फा लावल प्रा. लि.), अनिकेत भाेसले (सांगली वैभव काे आॅफ. क्रेडिट साेसा. लि. मुंबई), दत्तात्रय जाधव (गरवारे टेक्निकल फायबर्स, वाई), संजय खंडागळे (गाेदरेज अॅण्ड बाॅईज मॅन्यू कं. लि.), दत्तात्रय पवार (गाेदरेज अॅण्ड बाॅईज मॅन्यू कं. लि.), सचिन पेटकर (गरवारे टेक्निकल फायबर्स, वाई) यांना मान्यवरांच्या हस्ते गाैरविण्यात आले . तसेच महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा आदर्श गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राजकुमार किर्दत (अल्फा लावल प्रा. लि सातारा), विकास धुमाळ (महाराष्ट्र स्कुटर्स लि. सातारा), प्रविण जाधव (गाेदरेज अॅण्ड बाॅईज मॅन्यू कं. लि.) यांचा मान्यवरांच्या हस्ते गाैरव करण्यात आला.
यावेळी गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे श्री.दिलीप चरेगावकर, जयंत देशपांडे, इकबाल काझी, संदीप कांबळे, अशाेक जाधव, अनिकेत भाेसले, पेटकर , यांनी मनाेगत व्यक्त केले. संस्थापक व माजी अध्यक्ष गाेपाळराव खजुरे यांनी प्रास्ताविक प्रतिष्ठानची माहिती दिली. लक्ष्मीकांत राजंणे यांनी सूत्रसंचलन केले. गजानन घाडगे, अमृत साळुंखे, हणमंत ढवळे, दादासाहेब काळे, महेंद्र धनवे, शंकर मांढरे, अनिल म्हैसने, नितीन गायकवाड यांनी परिचय करून दिला. अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी स्वागत केले. दादासाहेब काळे यांनी आभार मानले.

Advertisement

कार्यक्रमास केंद्र प्रमुख कांबळे, अशाेक जाधव, गजानन घाडगे, सरचिटणीस दादासाहेब काळे, उपाध्यक्ष अमृत साळुंखे, संजय गिरी, जिल्हा संघटक संजय पवार, जिल्हा समन्वयक चंद्रकात लाेहार, प्रसिध्दी प्रमुख अभिजीत शिंगटे, सदस्य रुपाली काेंडे, शरद वाघमळे, विठ्ठल तांबे, नितीन गायकवाड, बाळासाहेब सणस, प्रजय राऊत, धनाजी जाधव, शंकर मांढरे, हणमंत ढवळे, राजकुमार किर्दत, विलास भुरगुडे, महादेव चव्हाण, सल्लागार अशाेक जाधव, गजानन घाडगे, संजय म्हस्के, संदीप कांबळे, अर्जुन सावंत, सागर पवार, रमेश सावंत, मनाेज पवार, जितेंद्र खरात, संजय म्हस्के, अर्जुन सावंत, हणमंत ढवळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!