सातार्‍यात ८ सप्टेंबरला ‘स्वर-रफी’ गाण्यांची सुरेल मैफल!


 

सातारा:

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आणि संगीतप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता एक विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वर-रफी’ या गाण्यांची सुरेल मैफल शनिवार पेठ येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे संपन्न होईल.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले गायक कलाकार अपर्णा गायकवाड, स्नेहलं चिंचणे, विनयकुमार, प्रमोद लोंढे आणि राजेंद्र पाटील हे आपल्या सुमधुर आवाजात मोहम्मद रफी यांच्या अजरामर गीतांचा नजराणा सादर करणार आहेत.

Advertisement

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. अनिल काटदरे, मा. हेमंत कासार, मा. गिरीश दोशी, मा. किशोर देशपांडे, मा. गोपाळ काळे, मा. प्रकाश बडदरे, मा. शिरीष चिटणीस (संस्थापक-अध्यक्ष, दीपलक्ष्मी पतसंस्था)मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सातार्‍यातील सर्व संगीतप्रेमी रसिकांनी या सुश्राव्य मैफलीचा आनंद घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!