नंदादीप कवितासंग्रह नव्या पिढीला मार्गदर्शक
पुस्तक प्रकाशन समारंभात मधू नेने यांचे प्रतिपादन
सातारा
आधुनिक जगामध्ये नवीन पिढी मूल्य विसरत चालली असताना सुरेख कुलकर्णी यांनी लिहिलेला नंदादीप हा कवितासंग्रह नव्या पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक मधू नेने यांनी केले
येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय यांच्यातर्फे वाचक व्यासपीठ उपक्रम अंतर्गत सुरेखा कुलकर्णी यांच्या ज्ञानदीप या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने उपस्थित होते
मधु नेने पुढे म्हणाले, सुरेखा कुलकर्णी यांनी अत्यंत सोप्या शब्दांमध्ये कवितांची रचना केली असून त्यानिमित्ताने सर्वांना भारतीय संस्कृतीतील वर्षभर चालणाऱ्या सण आणि समारंभाची माहिती होणार आहे नवीन पिढीला माहिती व ज्ञान देण्यासाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल
डॉ राजेंद्र माने यांनी साहित्यिकदृष्ट्या या पुस्तकाचा आढावा घेतला आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने या कविता रचण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही कवी कविता करत असताना विविध विषयांची निवड करत असतो. सुरेख कुलकर्णी यांनी भारतीय संस्कृतीतील सण समारंभ आणि संत यांची निवड करून एक वेगळा प्रयोग केला आहे त्यांच्याकडून भविष्यातही अशाच प्रकारच्या साहित्य निर्मितीची अपेक्षा करता येईल असेही ते म्हणाले
अध्यक्षीय भाषणामध्ये शिरीष चिटणीस यांनीही सुरेखा कुलकर्णी यांच्या प्रतिभेचे कौतुक केले आधुनिक काळात अशा प्रकारच्या साहित्याची गरज असून शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत असे साहित्य पोहोचणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले नवीन पिढीला भारतीय संस्कृतीबाबत जे प्रश्न पडतात त्याची उत्तरे निश्चितच या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना मिळू शकतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली
सुरेखा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण हा कवितासंग्रह का लिहिला याचे विवेचन केले
त्यावेळी सुरेखा कुलकर्णी यांच्या कन्येने या नंदादीप कविता संग्रहातील तीन कवितांचे वाचन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले
यावेळी ज्योत्स्ना कोल्हटकर,पद्माकर पाठकजी, मुकुंद फडके,डॉक्टर मोहन सुखटणकर,गौतम भोसले,आनंदा ननावरे आणि साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते
फोटो ओळ
कवितासंग्रहाचे प्रकाशन करता मधू नेने शिरीष चिटणीस डॉक्टर राजेंद्र माने वैदेही कुलकर्णी सुरेखा कुलकर्णी ज्योत्स्ना कोल्हटकर आणि इतर

