लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च


भारतीय करतात ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा
नवी दिल्ली
भारतात लग्न समारंभांवर शिक्षणापेक्षा दुपटीपेक्षा अधिक खर्च केला जातो, अशी माहिती गुंतवणूक संस्था जेफरीजने केलेल्या एका संशोधनात देण्यात आली आहे. भारतात एका लग्नावर सरासरी १५ हजार डॉलर म्हणजेच १२.५ लाख रुपये खर्च होतात, असेही जेफरीजने म्हटले आहे.भारतीय लोक बालवाडीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणावर होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा दुप्पट खर्च लग्नावर करतात.
भारतातील विवाह बाजार १०.९ लाख कोटी रुपयांचा झाला आहे. तो चीनपेक्षा कमी असला तरी अमेरिकेपेक्षा दुप्पट आहे. भारतीय लोक अन्न व किराणा सामानानंतर सर्वाधिक खर्च लग्नांवर करतात. भारतीयांचे सरासरी वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये असून, लग्नावरील त्यांचा सरासरी खर्च तीन वर्षांच्या कमाईएवढा असतो.
भारतात दरवर्षी सुमारे ८० लाख ते १ कोटी विवाह होतात. विवाहामुळे अनेक क्षेत्रांची सध्या चलती आहे. ज्वेलरी उद्योगात ५० टक्केपेक्षा अधिक पैसा हा वधूच्या दागिन्यांच्या विक्रीतून येतो.

Advertisement

भारतात विवाहाच्या सीझनमध्ये होणारी उलाढाल अशी आहे
दागिने ३.३५ लाख कोटी
जेवण २.१७ लाख कोटी
इव्हेंट्स १.६७ लाख कोटी
फोटो-व्हिडिओ १.० लाख कोटी
कपडे ८३,५७४ कोटी
सजावट ७५,२१७ कोटी
इतर १.७५ लाख कोटी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!