मोदी सरकारचा फॉर्म्युला ठरला
घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपद देणार
नवी दिल्ली
एनडीए सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनाचा प्रस्ताव दिला आहे. रविवारी 9 जूनला मोदी सरकार शपथ घेणार आहे.
त्यापूर्वी कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपद देणार देण्यात येणार आहे. घटक पक्षांना 7 कॅबिनेट, 11 राज्यमंत्रिपद मिळणार आहेत. शिवाय टीडीपी आणि जेडीयूला प्रत्येकी 2-2 मंत्रिपद देण्यात येणार असं सूत्रांनी सांगितलंय. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळणार असेल अशी शक्यता आहे
भाजपकडून 18 मंत्री असणार असून एलजेपी, जेडीएस, एचएएममधून प्रत्येकी एक मंत्री करण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटक पक्षांकडून एकूण 18 मंत्री केले जाणार आहेत. यात घटक पक्षांच्या 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्रीपदेही देण्यात आली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप स्वत:कडे गृह, अर्थ , संरक्षण आणि परराष्ट्र खाते ठरणार आहे. सध्या रेल्वे,अर्थ आणि कृषी खात्यासाठी जेडीयू आग्रही आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या सूत्रावर जेडीयू तसंच टीडीपी काय निर्णय घेणार हे चित्रही लवकरच स्पष्ट होईल.
नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी कडक सुरक्षा ठेवण्यात आलीय. तर 9 आणि 10 जूनला संपूर्ण दिल्लीत नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आलाय. तर ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅराजंपरला बंदी असणार आहे. रिमोट ऑपरेटेड फ्लाइंग मशिन्सच्या वापरालाही बंदी आहे.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी त्यांना शपथविधीसाठीचं आमंत्रण दिलं. मोदी लवकरच नव्या मंत्रिमंडळ सदस्यांची यादी राष्ट्रपतींना सादर असं समजतंय.
