संस्कार भारतीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
लोककला कलावंत भानुदास गायकवाड यांचा सत्कार
सातारा
सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारतीची बैठक वाई आणि सातारा येथे झाली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली
संस्कार भारतीच्या कार्यपद्धतीत बदल झाल्यावर प्रथमच वाई येथे बैठक झाली. यावेळी जुने व नवीन कलासाधक उपस्थित होते. बैठकीत नवीन जिल्हा कार्यकारिणी, आर्थिक बदल, विधा प्रमुख, यावर चर्चा झाली प्रांत सदस्यत्व आणि अधिकाधिक संस्कार मित्र जोडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले वर्षातील दोन अनिवार्य उत्सव गुरुपौर्णिमा व भरतमुनी जयंती व इतर कार्यक्रम, विविध सांस्कृतिक संस्था यांच्याशी संपर्क, होणारे सांस्कृतिक कार्यक्रम याची माहिती घेणे यावर मनमोकळा संवाद झाला. या बैठकीस गेली तीन दशकापेक्षा अधिक संस्कार भारतीच्या विविध पदांवर काम करणारे आणि वाईत संस्कार भारतीची मुहूर्तमेढ रुजवणारे,प्रसिद्ध उद्योजक, ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीशराव शेंडे उपस्थित होते. त्यांचे अनुभव कथन व मार्गदर्शन सर्वांनाच महत्त्वाचे ठरले . यावेळी अध्यक्ष दिलीप चरेगावकर, सचिव प्रदीप इनामदार, कोषप्रमुख विजय कुलकर्णी हे उपस्थित होते.यावेळी काही कलाविधी संयोजकांची नियुक्तीही करण्यात आली.
सातारा येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन प्रांत सदस्यत्व, संस्कारमित्र, गुरुपौर्णिमा उत्सव व प्रांताची सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बैठक, याबाबत चर्चा झाली यावेळी प्रसिद्ध लोककला कलावंत भानुदास गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष दिलीप चरेगावकर,उपाध्यक्ष संजय दीक्षित,मार्गदर्शक रेखा बंड ,सचिव,प्रदीप इनामदार ,सहसचिव संजीवकुमार आरेकर ,नाट्यविधा प्रमुख सौ रसिका केसकर,प्रचार प्रसिद्धी प्रमुख मुकुंद फडके,भानुदास गायकवाड उपस्थित होते
फोटो
भानुदास गायकवाड यांचा सत्कार करताना संस्कार भारतीचे पदाधिकारी

