बीबीए, बीसीए नोंदणीसाठी शुक्रवारी शेवटची संधी


यशोदा टेक्निकल कॅंपसमध्ये प्रवेश मार्गदर्शन कक्ष सुरू

सातारा
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष , महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी दुसऱ्यांदा अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.ही परीक्षा अद्याप प्रवेश न मिळालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर यशोदा टेक्निकल कॅंपस, सातारा येथे विशेष प्रवेश मार्गदर्शन व सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या सीईटी नोंदणीसाठी शुक्रवार दिनांक 20 जून 2025 अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश सहाय्यता केंद्रामार्फत सीईटी संबंधित सर्व माहिती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अभ्यास नियोजन आणि शंका समाधान यासाठी मोफत मदत केली जात आहे.
बीबीए, बीसीए हे अभ्यासक्रम उद्योग, आयटी, व्यवस्थापन व उद्योजकतेतील करिअर घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या अभ्यासक्रमासाठी CET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांकडून पूर्वीच्या प्रश्नपत्रिका, परीक्षा पॅटर्न, अभ्यास टिप्स, मॉक टेस्ट आणि वैयक्तिक मार्गदर्शन मिळते.
या उपक्रमामध्ये पालकांचेही मार्गदर्शन करून प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक व समजूतदार केली जाते.
यशोदा टेक्निकल कॅंपस ही साताऱ्यातील अग्रगण्य संस्था असून, बीबीए, बीसीए विभागात अनुभवी प्राध्यापक, अद्ययावत डिजिटल सुविधा, उद्योजकता विकास केंद्र आणि 100% प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड ही संस्थेची विशेष ओळख आहे.
प्रवेश मार्गदर्शन कक्ष रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुला असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित www.yes.edu.in या संकेतस्थळावर किंवा थेट कॉलेजमध्ये भेट देऊन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.
हा उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. दशरथ सगरे आणि उपाध्यक्ष मा. प्रा. अजिंक्य सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. नोंदणीची अंतिम तारीख ही आजच असल्याने विलंब न करता आजच अर्ज भरा असे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची आता भीती नाही.
व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व वाढत असताना बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी पहिल्यांदा झालेल्या सीईटी मध्ये बसलेले विद्यार्थ्यांची संख्या ही जागांच्या तुलनेत फारच कमी होती. . विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीला अनुसरून दुसऱ्यांना सीईटी घेण्याचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची आता भीती नाही.
प्रा. अजिंक्य सगरे- उपाध्यक्ष


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!