कालिदास दिना निमित्त मंगळवारी वर्षासंध्या कार्यक्रम
संस्कार भारती साहित्य विधा,दिपलक्ष्मी पतसंस्था यांचे आयोजन
सातारा
संस्कार भारती साहित्य विधा आणि दिपलक्ष्मी पतसंस्था सातारा यांच्यातर्फे कालिदास दिना निमित्त वर्षासंध्या हा कार्यक्रम मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे दिपलक्ष्मी सभागृह, रजनी क्लास शेजारी, कन्या शाळेमागे , सातारा येथे हा कार्यक्रम सांयकाळी 5 : 30 ते 7:30 वाजेपर्यंत होणार आहे
या कार्यक्रमात कालिदास चरित्र आणि साहित्य संपदा या विषयावर श्री मधू नेने यांचे व्याख्यान होणार आहे . तसेच मल्हार रंग हा कार्यक्रम ऍड अमित द्रविड ( गायन ) , श्री बाळासाहेब चव्हाण ( संवादिनी ), श्री शांताराम दयाळ ( तबला ) सादर करणार आहेत
मन चिंब पावसाळी या अंतर्गत मान्यवर कवींच्या वर्षागीतांचे अभिवाचन केले जाणार असून त्यःचे सादरीकरण सौ. सुरेखा कुलकर्णी, सौ. सुप्रिया मोरे, रमाकांत देशपांडे, डॉ. सुनील देशपांडे करणार आहेत
कार्यक्रम निःशुल्क असून वेळेत सुरू होणार असल्याने सर्वांनी वेळेत यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे
