नंदादीप कवितासंग्रहाचे रविवारी प्रकाशन


सातारा
येथील श्रीमती सुरेखा कुलकर्णी यांच्या नंदादीप या कविता संग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक 22 जून रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा नगर वाचनालयाच्या पाठक हॉल येथे होणार आहे
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा यांच्यातर्फे वाचक व्यासपीठ उपक्रमामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी संत साहित्याचे अभ्यासक लेखक मधू नेने यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस असणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगर वाचनालयातर्फे अध्यक्ष अजित कुबेर, अतुल जोशी आणि अनंत जोशी यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!