साताऱ्यात पर्यटनासाठी निर्बंध जारी


जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू
सातारा :
अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिवमंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ, व धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परिसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते. या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.19 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश आहेत

Advertisement

या गोष्टींना मनाई
पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रिकरण करणे याला मनाई करण्यात आली आहे
धबधब्यांजवळ मद्यपानास मनाई
पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल असे वेगाने चालविणे, वाहनांची ने-आण करताना बेदकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, यास मनाई आहे
अश्लील वर्तन करु नये
सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लील हावभाव करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, यास मनाई आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!