झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू


मुंबईतील 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला
मुंबई
झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून मुंबईत एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला असं या मृत तरुणाचं नाव आहे.सहाव्या मजल्यावरुन पडल्यानंतर मुस्तफा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला सेफी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. मुस्तफाचा मृत्यू झाला.भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या चुनावाला कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चुनावाला यांना एक 19 वर्षांचा मुलगा होता. या मुलाला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री मुस्तफा झोपेत चालत असताना सहाव्या माळ्यावरून खाली पडला. मुस्तफा तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. त्यानंतर त्याला तात्काळ सेफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!