मारुती चितमपल्ली याना शुक्रवारी श्रद्धांजली
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयतर्फे आयोजन
सातारा
अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं दु:खद निधन झालं.चित्तमपल्ली यांची मोठी ग्रंथसंपदा आहे .श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा तर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे . सर्व साहित्य रसिकांनी, वाचकांनी व साहित्यिकांनी शुक्रवार दिनांक 20 रोजी सकाळी साडेनऊ वाजता नगर वाचनालयात उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
जंगल भ्रमण हा मारुती चितमपल्ली यांचा आवडता प्रांत होता.ते झाडांच्यात रमले. त्यांनी पक्षांचा अभ्यास केला.पक्षी कोश निर्माण केला.
हा अभ्यास आणि जंगलविश्व त्यांनी साहित्यरूपाने वाचकासमोर मांडले . एकाद्या ऋषी प्रमाणेच त्यांची ही साहित्य तपस्या होती.

