जेजुरी-मोरगाव रोडवर अपघातात ८ ठार
सातारा
जेजुरी-मोरगाव रोडवर मोठा अपघात झाला असून अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जेजुरी-मोरगाव मार्गावर पिकअप आणि कारची धडक झाली. जेजुरीहून बारामतीकडे निघालेली एक कार उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला जाऊन धडकली आणि यामध्ये पिकअप टेम्पोमधून साहित्य बाहेर काढणारे, त्याचबरोबर कारमधील काही प्रवासी अशा 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये कारमधील 4 जणांचा समावेश आहे
जखमींना जेजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर जेजुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत.
जेजुरी – मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर भरधाव वेगात आलेल्या कारने थांबलेल्या पिकअप टेम्पोला धडक देऊन शेजारीच उभा असलेल्या कारवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, जागेवरच आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोमनाथ रामचंद्र वायसे, रामु संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. इंदापूर) अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे असून अन्य एकाची ओळख पटू शकली नाही.

