जो जे वांछील तो ते लाहो


न्यूजमंडी/पॉझिटिव्ह
दाम्पत्याच्या घरकामावर नजर ठेवणार अनोखे ॲप

घरगुती वाद विवाद टाळण्यासाठी स्पेन सरकारचा उपक्रम

माद्रिद

आधुनिक जगामध्ये पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत असतात या पार्श्वभूमीवर घरकाम कोणी करायचे आणि किती प्रमाणात करायचे यावरून सतत वादविवादही होत असतात याच समस्यावर तोडगा काढण्यासाठी स्पेन सरकारने एक अनोखे ॲप विकसित केले असून या ॲपद्वारे पती आणि पत्नी यांच्या घरकामावर नजर ठेवली जाणार आहे साधारणपणे पती घर कामात अजिबात योगदान देत नाही अशी पत्नीची तक्रार असते म्हणूनच ह्या ॲपच्या माध्यमातून पतीने घर कामामध्ये किती योगदान दिले आहे हे कळू शकणार आहे आणि ॲपच्या माध्यमातून पत्नी तक्रारही करू शकणार आहे या ॲपच्या माध्यमातून फक्त पतीच्या घरकामातील योगदानावर नजर ठेवली जाणार नसून पत्नी आणि घरातील इतर सदस्य यांच्या योगदानाचाही विचार केला जाणार आहे सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून स्पेन सरकारने हे ॲप विकसित केले आहे स्पेनच्या नॅशनल स्टॅटिस्टिकस इन्स्टिट्यूटने नुकत्याच केलेल्या सर्वेतील निष्कर्षाप्रमाणे पती आणि पत्नी या दोघांनीही आपणच जास्त प्रमाणात घरकाम करत असल्याचा दावा केला होता याच पार्श्वभूमीवर स्पेन सरकारने हे ॲप विकसित केले आहे ॲपमध्ये घरात दररोज केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामासाठी साधारण किती वेळ लागू शकतो आणि संबंधित सदस्याने त्यासाठी किती वेळ घेतला याची नोंद सुद्धा केली जाणार आहे पती-पत्नी आई-वडील मुले या सर्वांना कशाप्रकारे कामाचे विभाजन करता येईल याचा विचारही या ॲपमध्ये करण्यात आला आहे गेल्या काही वर्षांमध्ये पत्नी घरात करत असलेल्या कामाच्या बदल्यात तिला नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारचे अनेक निकाल स्पेनमधील विविध न्यायालयानी दिले असल्याने त्याचाही विचार करून स्पेन सरकारने हे ॲप अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे गृहिणीच्या ज्या कामांची मोजमाप होत नाही त्याची नोंद सुद्धा या ॲपच्या माध्यमातून घेतली जाणार आहे मे महिन्याच्या अखेरीस हे ॲप स्पेन मध्ये सर्वत्र लागू करण्याचा विचार स्पेन सरकार करत आहे स्पेनच्या जेंडर इक्वलिटी मंत्री अँजेला रोड्रिक्स यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे

 


न्यूजमंडी/ज्ञानकोश
पंडित नेहरू

Advertisement

1929 मध्ये पंडित नेहरू काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते. यापूर्वी काँग्रेसची मागणी ही सेल्फ गवर्नन्स म्हणजेच स्वप्रशासन अशी होती. पण ती त्यांच्या नेतृत्वात बदलून आता स्वराज्य आणि पूर्ण स्वातंत्र्य अशी करण्यात आली होती. हा एक मोठा बदल काँग्रेस आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनातील इतिहासात त्यांच्याच नेतृत्वात घडल्याचे आपल्याला पाहायला मिळते.महात्मा गांधींच्या नेतृत्वात झालेल्या सर्व आंदोलनात ते सहभागी झाले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार विविध माध्यमांतून केला. गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह सुरू केला. सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि गरजेचा प्रश्न त्यांनी ऐरणीवर तर आणलाच पण सामान्य माणसाचा प्रश्न हा स्वातंत्र्य आंदोलनाच्या केंद्रस्थानी असू शकतो हे देखील दाखवून दिले. त्यांच्या लढ्यात काँग्रेस पूर्ण शक्तिनिशी उतरली होती. या आंदोलनाच्या काळात पं. नेहरू यांना अनेकवेळा तुरुंगवास घडला होता. तुरुंगात असताना त्यांनी विपुल लिखाण केले. 1935 साली त्यांनी तुरुंगात असताना आत्मचरित्र पूर्ण केले आणि हे आत्मचरित्र 1936 मध्ये प्रकाशित करण्यात आले. हे आत्मचरित्र केवळ त्यांच्याच आठवणीआणि घटनांचा संग्रह नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळ समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा दस्तावेज मानण्यात येतो.महात्मा गांधींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहात ते सहभागी झाले होते. विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते तर पं. नेहरू हे दुसरे सत्याग्रही होते. पुढे ते भारत छोडोमध्ये देखील सहभागी झाले होते. भारत छोडोवेळी त्यांना जो तुरुंगवास झाला होता त्यावेळी त्यांना अहमदनगर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते.भारत छोडोचे आंदोलन शिखरावर असतानाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. आझाद हिंद सेनेच्या अनेक अधिकाऱ्यांना तुरुंगवास झाला आणि इंग्रजांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला होता.
1945 मध्ये पं. नेहरूंनी आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांचा बचाव केला. पण हा खटला नेहरू हरले. असं असलं तरी त्यांचा सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याला असलेला पाठिंबा आणि त्यांचे राष्ट्रप्रेम यातून दिसून येते


न्यूजमंडी/सुविचार
१. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.

२. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.

३. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.


न्यूजमंडी/विनोद

प्रेम
मुलगी: मी शेजारच्या पांडुवर प्रेम करते आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे..

बाप: धन्यवाद !!! माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल..

मुलगी: अहो, बाबा मी पत्र वाचते आहे, बहुतेक आई पळाली…

तब्बेत

डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?

नवरा: बरं वाटतंय तिला आता, आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय

न्यूजमंडी/खाद्ययात्रा

ढोकळा
साहित्य
100 ग्रॅम एकदम बारीक चाळून घेतलेले चणा डाळ पीठ…साईट्रीक अँसिड – 1 चमचा मीठ – 1/2 चमचासाखर – 2 चमचे
हिंग – 1/4 चमचा खायचा सोडा /इनो – 11/2 चमचा
कृती
वरील सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून एकजीव करून एका पातेल्यात काढून घ्यावे. एकीकडे पाणी उकळत ठेवावे ढोकळा वाफवून घेण्यासाठी.
त्या नंतर एक वाटी पिठात दीड वाटी पाणी घालून छान फुलून येई पर्यंत हलक्या हाताने एकाचे दिशेने ढवळून घ्यावे. गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
पीठ चाळून घेतलेले असेल तर शक्यतो गाठी तयारच होत नाहीत. तरीही एकदा खात्री करून घ्यावी. व ज्या थाळीत किंवा डब्यात ढोकळा लावायचा असेल त्यावर लगेच घालावे अणि थोडेसे टॅप करून पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे.आपल्या आवडी नुसार वरून हिंग व साखरेचे पाणी घालावे व फोडणी लावून ढोकळा तयार

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!