संगम माहुली येथे गंगेची आणि कृष्णेची आरती
रामकृष्ण पठण मंडळाच्या महिलांचा उपक्रम
सातारा
साताऱ्यातील रामकृष्ण पठण मंडळाच्या प्रमुख श्रीमती उमा आठल्ये यांनी नुकताच अनोखा उपक्रम राबवला. संगम माहुली येथे आठल्ये बाईंनी संस्कारीत केलेल्या 65 महिलांनी पंडितराज जगन्नाथ यांच्या गंगा लहरी स्तोत्राचे पठण अतिशय सुरेलपणे केले. त्यानंतर कृष्णा नदीवर जाऊन सर्व जणींनी हातात दिवे घेऊन गंगेची आणि कृष्णेची आरती केली. कृष्णानदीला दीपदान करून हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला.हा अनोखा कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थानी व पर्यटकांनी भरपूर गर्दी केली होती,ह्या कार्यक्रमात सातारा व आसपासच्या परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता भारतात गंगा ही अत्यंत पवित्र नदी मानली जाते.ऋग्वेदात सुद्धा गंगेचा उल्लेख आहें.प्रत्येक लहान-मोठ्या नदीला गंगाच मानलं जाते. आपल्या जीवनात नद्यांचे खूपच महत्व आहे म्हणून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

