बीबीए,बीसीए साठी पुन्हा सीईटी 


यशोदा टेक्निकल कॅंपसमध्ये प्रवेश मार्गदर्शन कक्ष सुरू

सातारा
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष  महाराष्ट्र यांच्याद्वारे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीबीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सीईटीचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेशाची समान संधी देण्यासाठी हे सीईटी आयोजन महत्त्वाचे ठरणार आहे.ही परीक्षा दुसऱ्यांदा घेतली जात असून, त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर यशोदा टेक्निकल कॅंपस, सातारा ने विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश मार्गदर्शन व सहाय्यता केंद्र सुरू केले आहे.या कक्षामध्ये विद्यार्थ्यांना सीईटी विषयी सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अभ्यासाचे नियोजन आणि शंकानिवारण अशा सर्व सेवा विनामूल्य पुरवण्यात येणार आहेत.
बीबीए आणि बीसीए हे दोन्ही अभ्यासक्रम उद्योग, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन व उद्योजकता क्षेत्रात उज्वल करिअरच्या संधी देणारे आहेत. सीईटी चा अभ्यासक्रम, परीक्षेचा पॅटर्न, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यावर आधारित मार्गदर्शन तज्ज्ञ प्राध्यापकांकडून दिले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट, प्रश्नसंच, अभ्यासमूल्य टिप्स आणि वैयक्तिक मार्गदर्शनाची सुविधा देखील उपलब्ध आहे. या प्रवेश कक्षामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही सखोल समज निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी अधिक प्रभावीपणे प्रवेश परीक्षेला सामोरे जाऊ शकतात.
यशोदा टेक्निकल कॅंपस ही साताऱ्यातील अग्रगण्य संस्था असून, बीबीए आणि बीसीए मध्ये उच्च गुणवत्ता, डिजिटल सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि 100% प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.संस्थेच्या इमारतीत प्रवेश सहाय्यता केंद्र उभारले असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी तेथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. दशरथ सगरे व उपाध्यक्ष मा. प्रा. अजिंक्य सगरे यांच्या प्रेरणेतून होत आहे.सीईटी ची परीक्षा लवकरच घोषित होणार असून, विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज करून तयारीला लागणे गरजेचे आहे.
प्रवेश मार्गदर्शन कक्ष रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत खुला असणार आहे.विद्यार्थ्यांनी संस्थेच्या www.yes.edu.in या संकेतस्थळावर किंवा थेट कॉलेजमध्ये संपर्क साधावा. सातारा जिल्ह्यातील तसेच इतर तालुक्यांतील विद्यार्थी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रातील करिअर घडवू शकतात

Advertisement

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व वाढत असताना बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी पहिल्यांदा झालेल्या सीईटी मध्ये बसलेले विद्यार्थ्यांची संख्या ही जागांच्या तुलनेत फारच कमी होती. . विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीला अनुसरून दुसऱ्यांना सीईटी घेण्याचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची आता भीती नाही,अशी माहिती उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!