संगीत ही माणसे जोडणारी दैवी शक्ती: विशाल निकम
सातारा
“संगीत ही माणसे जोडणारी दैवी शक्ती आहे. नव्या पिढीला अनेक आव्हानांना सामोरे जाताना कोणतीही कला सावरू शकते. तसेच; आत्मिक शक्ती देऊ शकते. त्याचप्रमाणे संगीत देखील अशी कला आहे. ज्यांना गायन, वादन अशी आवड आहे त्यांनी त्यामध्ये प्राविण्य प्राप्त करावे.”, असे प्रतिपादन विशाल अँटिक शॉपचे प्रमुख आणि विविध कार्यक्रमांचे आयोजक विशाल निकम यांनी केले.
येथील “विशाल अँटिक” मध्ये आयोजित संगीत ग्रुपच्या मेळाव्यात त्यांनी हे मत व्यक्त केले. “संगीत कलेचे महत्त्व” याविषयी निबंध स्पर्धा त्यांनी जाहीर केली. श्री विशाल निकम,विशाल अँटिक, कन्याशाळेशेजारी, सिटी पोस्ट जवळ, राजपथ सातारा या पत्त्यावर 300 शब्दात निबंध पाठवा. सर्वोत्कृष्ट पाच निबंधांना बक्षिसे दिली जातील, असे त्यांनी जाहीर केले. या स्पर्धे साठी प्रवेश फी आणि वयोमर्यादा नाही. यावेळी प्रसिद्ध वक्ते गायक यशेंद्र क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी विविध विद्यार्थिनी गायिका उपस्थित होत्या. त्यांनी विविध गाणी सादर करून आपली कला सादर केली. श्री.विशाल निकम यावेळी म्हणाले,”कोणतीही कला बहरत जाण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते. विशाल अँटिक मध्ये केवळ दुर्मिळ वस्तू मिळतात, असे नव्हे तर येथे संगीताचे उत्तम शिक्षण दिले जाते. रियाज करून घेतला जातो .गाणी म्हणण्याबद्दलची भीती दूर केली जाते. कोठेही शिका, परंतु मन लावून शिका.गाणे ही ईश्वरी देणगी असून त्याच्याकडे हलक्या दृष्टीने पाहू नये. गाणे शिकण्यासाठी कोणतेही वय नाही. कराओके पद्धत गाण्यासाठी खूप छान आहे त्याची काही नियम आहेत. त्यासाठी रियाज आणि नियमित सराव गरजेचा आहे .तसेच मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर ,नौशाद, लक्ष्मीकांत प्यारेलाल ,मन्ना डे यांच्यापासून ते कुमार सानू, अलका याग्निक, नदीम श्रवण अशा संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्यासमोर खजिना तयार ठेवला आहे .त्यातून आनंद मिळवावा. गेट-टुगेदर, विविध शुभकार्यासाठी कार्यक्रम, मनोरंजक कार्यक्रम, बोलक्या बाहुलीचा कार्यक्रम हे देखील मागणीनुसार सातारा येथील राजपथावर सिटी पोस्ट शेजारी विशाल अँटिक येथे संपर्क केल्यास सादर केले जातील.”
यावेळी श्री क्षीरसागर यांनी श्री. निकम यांच्या प्रयत्नांबद्दल कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.

